Water Cut : ठाणे शहरात १९ डिसेंबर पर्यत ५० टक्के पाणी कपात

15 Dec 2025 15:38:33

Water Cut
 
ठाणे : (Water Cut) कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि.मी व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी नादुरूस्त झाली होती, सदर जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु या कामास आणखी ४ दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाणे शहरात १९ डिसेंबर २०२५पर्यत ५० टक्के पाणी कपात (Water Cut) लागू करण्यात येत आहे.(Water Cut)
 
पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात (Water Cut) लागू करण्यात येत आहे.(Water Cut)
 
हेही वाचा : Local Body Election Results : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर डाव्यांचा उन्माद 
 
शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी दि. १९.१२.२०२५ पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा (Water Cut) होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.(Water Cut)
 
Powered By Sangraha 9.0