BMC Elections : महापालिका निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता! आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार

15 Dec 2025 12:42:22
 
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र महापालिका (BMC Elections) आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता माध्यमांवरून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL! ; मुख्यमंत्री फडणवीस
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या (BMC Elections) निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहेत. यात प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानंगर, धुळे, जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अकोला, अमरावती अशा एकूण २९ महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या पत्रकार परिषद लागून आहे. (BMC Elections)
 
 
Powered By Sangraha 9.0