बिगबॉस मराठी ६ ‘या’ दिवशी होणार सुरु; रितेश देशमुख पुन्हा होस्टच्या भूमिकेत

15 Dec 2025 18:48:36


मुंबई : लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, सिझन ६ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता रितेश देशमुख यंदाही या सिझनचा होस्ट असणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमुळे या सिझनबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

प्रोमोमध्ये रितेश देशमुख “स्वागताला दारं उघडी ठेवा… मी येतोय” असं म्हणताना दिसत असून, या संवादाने बिग बॉस मराठी सिझन ६ चं अधिकृत बिगुल वाजलं आहे. मागील सिझनला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, यंदाचा सिझन अधिक भव्य आणि वेगळ्या स्वरूपात सादर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.






View this post on Instagram
















A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने पार पडला बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग. घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असे ही असणार. पण, मी गप्प नाही बसणार...! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. बिग बॉस मराठी सिझन ६ हा ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहता येणार आहे.




Powered By Sangraha 9.0