Tejasvi Ghosalkar : उबाठा गटाला धक्का; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

15 Dec 2025 18:43:35
Tejasvi Ghosalkar
 
मुंबई : (Tejasvi Ghosalkar) उबाठा गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी सोमवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या उपस्थितीत दादर येथील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.(Tejasvi Ghosalkar)
 
यावेळी आ. प्रविण दरेकर, भाजप मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, महामंत्री राजेश शिरवडकर, गणेश खणकर जी, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक तावडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Tejasvi Ghosalkar)
 
हेही वाचा : Britain : ब्रिटनमधील लाखो मुस्लिम नागरिकांचे नागरिकत्व धोक्यात?
 
या पक्ष प्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी भावनिक पोस्ट केली. "नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत. वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे, असेही त्या म्हणाल्या.(Tejasvi Ghosalkar)
 
Powered By Sangraha 9.0