नागपूर : (Chandrashekhar Bawankule) विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले आहेत. नागपूर विधानभवन येथे शनिवारी (दि. १३) पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.(Chandrashekhar Bawankule)
बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Chandrashekhar Bawankule)
या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGMC), शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शासकीय दंत महाविद्यालयाच्या विविध विकासाकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.(Chandrashekhar Bawankule)
मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी : मेडिकलच्या टी.बी. वॉर्ड परिसरात कर्करुग्णालयासाठी एक मजला वाढवून मिळणे, सिकलसेल आणि थॅलेसिमिया हॉस्पिटलचे बांधकाम, तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी (वर्ग १ ते ४) नवीन निवासस्थानांच्या बांधकामाला गती देण्यावर चर्चा झाली. तसेच, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 'ए', 'बी' आणि 'सी' विंगमधील अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरच्या अद्ययावतीकरणाचे काम (HVAC आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन) करण्याचे प्रस्तावित आहे.
हेही वाचा : CIDCO : सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात
मेयो रुग्णालयाचा विस्तार : मेयो रुग्णालयातील वाढीव १३६० खाटांच्या क्षमतेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार वर्ग १ ते वर्ग ४ ची पदे मंजूर करणे आणि ५२६ सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात आला.
अमरावती वैद्यकीय महाविद्यालय : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे सन २०२५-२६ या वर्षात दुसऱ्या वर्षाच्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
आयुर्वेद महाविद्यालयाची क्षमता वाढ : नागपूरच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता १०० वरून २०० पर्यंत वाढवणे आणि चार नवीन विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन इमारतींचे बांधकाम व २१४ नवीन पदांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.
याशिवाय, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिक बेरोजगार तरुणांना कंत्राटी तत्त्वावर रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतही या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागांना या सर्व कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार असून रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.