मुंबई : (Kerala) केरळच्या (Kerala) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Kerala) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला. तिरुवनंतपुरम महानगरपालिका आणि त्रिपुनिथुरा नगरपालिका यासह प्रमुख शहरी केंद्रांवर भाजपप्रणीत एनडीएने विजय मिळवला. पारंपारिकपणे डाव्या लोकशाही आघाडीचे वर्चस्व असलेल्या केरळच्या राजकीय परिदृश्यात हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे.(Kerala)
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत (Kerala) भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या डाव्या लोकशाही आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थेवरील ४५ वर्षांची पकड संपुष्टात आणली आहे. महानगरपालिकेतील १०१ पैकी ५० वॉर्डमध्ये एनडीएने विजय मिळवला, तर सत्ताधारी एलडीएफ २९ जागांवर घसरला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) ने १९ जागा जिंकल्या, तर दोन जागी अपक्षांनी विजय मिळवला आहे.(Kerala)
मिळालेल्या माहितीनुसार, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Kerala) पहिल्या टप्प्यात ७०.९१ टक्के मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात ७६.०८ टक्के मतदान झाले." तिरुअनंतपुरम हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा मतदारसंघ असल्याने हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. भाजपला या निकालाचा पुढील वर्षी होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या राजकीय जुळवणी आणि प्रचाराच्या रणनीतींवर परिणाम होण्याचा विश्वास आहे.(Kerala)
भाजपने दक्षिण विजयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कंबर कसली आहे. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या जात आहेत. दक्षिणेतील अनेकांना राज्यसभेवर घेतले जात आहे. अनेक केंद्रीय नेत्यांचे दक्षिणेत प्रवास सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः याचे नेतृत्व करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जानेवारी २०२६ पासून ते दर महिन्याला दोन दिवस दक्षिणेत राहणार आहेत. यादरम्यान ते संघटनात्मक बैठका, बूथस्तरीय तयारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.(Kerala)
केरळमधील कार्यकर्त्यांचा संघर्ष आठवण्याचा दिवस
लोकांमध्ये काम करणाऱ्या सर्व मेहनती भाजप कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, ज्यामुळे तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत शानदार निकाल आला आहे. आजचा निकाल प्रत्यक्षात येण्यासाठी केरळमधील कार्यकर्त्यांचे योगदान आहे. या कार्यकर्त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे काम आणि संघर्ष आठवण्याचा दिवस आहे. आमचे कार्यकर्ते ही आमची ताकद आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. केरळमधील (Kerala) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो.(Kerala)
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीचा स्विकार
तिरुअनंतपुरममधील (Kerala) भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीची प्रशंसा आहे. शहर महानगरपालिकेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण विजयाबद्दल नम्र अभिनंदन करतो. मी ४५ वर्षांच्या एलडीएफच्या प्रशासनातून बदल घडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मतदारांनी शेवटी दुसऱ्या पक्षाला निवडले. यावरून लोक प्रशासनात स्पष्ट बदल शोधत होते हे लक्षात येते. हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याचा आदर केला पाहिजे.(Kerala)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.