Lionel Messi : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मेस्सीच्या कार्यक्रमात संतप्त चाहत्यांकडून तोडफोड, लिओनेल मेस्सीच्या लवकर निघून जाण्याने उडाला गोंधळ!

13 Dec 2025 18:04:35


Lionel Messi

 
मुंबई : (Lionel Messi) कोलकात्याच्या सॉल्ट लेक येथील युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर शनिवारी दि. १३ डिसेंबर रोजी अर्जेंटिनाच्या दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या (Lionel Messi) कोलकाता दौऱ्याला उपस्थित असलेल्या संतप्त चाहत्यांनी पाणी बॉटल आणि खुर्च्या फेकत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. हजारो चाहत्यांनी या फुटबॉल स्टारची एक झलक पाहण्यासाठी १२,००० रुपयांपर्यंत पैसे दिले होते, परंतु जेव्हा तो मैदानाभोवती फिरण्यासाठी बाहेर पडला तेव्हा अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या मोठ्या घोळक्याने त्यांल्या घेरून ठेवल्याने, चाहत्यांना त्याची झलक देखील न मिळाल्याने आणि मेस्सीच्या (Lionel Messi) लवकर निघून जाण्याने त्यांना निराशा झाली. त्यानंतर ही संतापण जनक स्थिती निर्माण झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर, रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली.
 

दरम्यान माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, पहाटे २:२६ वाजता कोलकाता येथे पोहोचलेल्या मेस्सीने (Lionel Messi) शहरातील त्याच्या ७० फूट उंच पुतळ्याचे अक्षरशः अनावरण करून दिवसाची सुरुवात केली. सकाळी ११:३० च्या सुमारास ते सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाले आणि लगेचच राजकीय नेते, माजी फुटबॉलपटू, प्रशिक्षक आणि आयोजन समितीच्या इतर सदस्यांनी त्यांच्या भोवती घोळका केला. त्यामुळे स्टँडमध्ये गर्दी करणाऱ्या चाहत्यांना त्यांच्या आयकॉनची झलक पाहण्याची संधीच मिळाली नाही. (Lionel Messi)
 

त्यानंतर, कडक सुरक्षेत मेस्सी (Lionel Messi) स्टेडियममधून बाहेर पडताना पाहून प्रेक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी बाटल्या आणि पोस्टर फेकण्यास सुरुवात केली. मेस्सी गेल्यानंतर काही मिनिटांतच, गर्दीने सॉल्ट लेक स्टेडियमवर हल्ला करत मध्यभागी जमा झाले. स्टेडियमच्या आत तयार केलेल्या तात्पुरत्या तंबूंची देखाल चाहत्यांकडून तोडफोड करण्यात आली. (Lionel Messi)




 
Powered By Sangraha 9.0