Deekshabhoomi : दीक्षाभूमी विकासकामांसाठी संवेदनशील व शास्त्रीय नियोजनाचे निर्देश

    13-Dec-2025
Total Views |
Deekshabhoomi
 
नागपूर : (Deekshabhoomi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी (Deekshabhoomi) हे जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान असल्याने येथे होणाऱ्या सर्व विकासकामांचे नियोजन अत्यंत संवेदनशीलतेने, शास्त्रीय पद्धतीने आणि पूर्ण दक्षता घेऊन करावे. स्तूपाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता तसेच मुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच सर्व कामे राबविण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.(Deekshabhoomi)
 
नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत मंत्री संजय शिरसाट यांनी दीक्षाभूमी (Deekshabhoomi) येथे सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी कामांच्या अंमलबजावणीत गुणवत्ता, सुरक्षितता आणि श्रद्धेचा आदर या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.(Deekshabhoomi)
 
हेही वाचा : Ustad Zakir Hussain : उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ५० हून अधिक कलाकार एकत्र
 
या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो. ना. बागुल तसेच सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान दीक्षाभूमीच्या (Deekshabhoomi) पवित्रतेचे जतन राखून विकासकामे कशी राबविता येतील, याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.(Deekshabhoomi)
 
दीक्षाभूमीच्या (Deekshabhoomi) जागतिक महत्त्वाचा विचार करता, भविष्यातील सर्व विकासकामे ठरावीक नियमावलीनुसार आणि आवश्यक परवानग्या घेऊनच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.(Deekshabhoomi)