Dr. Pankaj Bhoyar : 'एसआरए' आणि म्हाडा इमारतींच्या देखभाल निधीत वाढ; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची घोषणा

13 Dec 2025 16:40:56
 
Dr. Pankaj Bhoyar
 
नागपूर : (Dr. Pankaj Bhoyar) मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना चांगली घरे आणि मूलभूत सुविधा मिळाव्या, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि म्हाडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांच्या इमारतीच्या उंचीनुसार देखभाल निधीत (कॉर्पस फंड) वाढ करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विधानसभेत केली.
 
आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) म्हणाले की, "आतापर्यंत एसआरए आणि म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये प्रति सदनिका केवळ रुपये ४० हजार कॉर्पस फंड मिळत होता. मात्र, या रकमेतून प्रत्यक्ष खर्च भागत नसल्याची बाब लक्षात घेऊन शासनाने समिती गठीत केली. या समितीच्या अहवालानुसार, कॉर्पस फंडाची रक्कम आता इमारतीच्या उंचीनुसार वाढवली जाईल. हा बदल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार अधिसूचना जारी करून लागू करण्यात येईल. हरकती-सूचनांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी होईल." (Dr. Pankaj Bhoyar)
 
हेही वाचा : ajit pawar : अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे अपेक्षित होते; मुंढवा जमीन घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया 
 
कॉर्पस फंडाच्या रकमेचे स्वरुप कसे असणार?
 
७० मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीसाठी - १ लाख रुपये
७० ते १२० मीटर उंचीच्या इमारतीसाठी - २ लाख रुपये
१२० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी - ३ लाख रुपये
 
इमारतीवर सोलर पॅनल बसविणे बंधनकारक
 
"ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्विकास प्रकल्पांत ओसी देण्यापूर्वी इमारतीवर सोलार पॅनल बसविणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच, ओसीशिवाय ताबा देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करण्यात येईल. विशेषतः लिफ्ट आणि सामाईक भागांसाठी सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य असेल. अपूर्ण इमारतींमध्ये पजेशन दिल्यास सखोल चौकशी केली जाईल," असेही राज्यमंत्री पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी स्पष्ट केले.
 
 
Powered By Sangraha 9.0