CIDCO : सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात

13 Dec 2025 19:29:08
 CIDCO
 
नागपूर : (CIDCO) नवी मुंबईतील सिडकोच्या (CIDCO) वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.(CIDCO)
 
यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सिडकोतर्फे (CIDCO) नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७ हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्के कमी होतील.(CIDCO)
 
हेही वाचा : All India Seafarers Association : भारतीय नाविकांसाठी मोठा दिलासा, विमानतळावर नाविकांना येणाऱ्या अडचणीवर डीजी शिपिंग घेणार मोठा निर्णय
 
या संदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत.(CIDCO)
 
 
 
Powered By Sangraha 9.0