Alexander Duncan : जो न हो सका राम का वो न किसी काम का!

11 Dec 2025 19:03:26
Alexander Duncan
 
मुंबई : (Alexander Duncan) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील नेता आणि टेक्सास राज्यातील सेनिट उमेदवार अलेक्झेंडर डंकन (Alexander Duncan) यांचा निवडणूकीतील प्रवास सुरू होण्यापूर्वीच संपला. प्रायमरी निवडणुकीसाठी आवश्यक समर्थन आणि स्वाक्षऱ्या मिळवण्यात ते अपयशी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकन हिंदूंनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची रिपब्लिकन पार्टीच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते. यावेळी मात्र हिंदू प्रचंड नाराज असल्याचे दिसले, ते अलेक्झेंडर डंकन (Alexander Duncan) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच.(Alexander Duncan)
 
सप्टेंबर महिन्यात टेक्सासच्या शुगर लँड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरातील ९० फूट उंच भगवंत हनुमानांच्या प्रतिमेला “खोट्या देवाची खोटी मूर्ती” असे म्हटले होते. 'आपण ख्रिश्चन राष्ट्र आहोत तर टेक्सासमध्ये एका खोट्या हिंदू देवाची खोटी मूर्ती का उभारली जात आहे?' डंकनच्या या वादग्रस्त विधानामुळे अमेरिकेतील हिंदू समाजात प्रचंड संताप उसळला. हजारो लोकांनी डंकनवर धार्मिक असहिष्णुता, हिंदू-विरोधी द्वेष आणि भेदभाव पसरवल्याचा आरोप केला.(Alexander Duncan)
 
हेही वाचा : Chief Minister's Relief Fund : मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन महिन्यात ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये वितरित  
 
इतकेच नव्हे तर, हिंदू अमेरिकन फाउंडेशन (एचएएफ) ने टेक्सास रिपब्लिकन पार्टीकडे डंकनवरील कारवाई आणि पक्षातून हकालपट्टीची मागणी केली. एचएएफने सांगितले की डंकनचे वक्तव्य पक्षाच्या भेदभावविरोधी धोरणांचे उल्लंघन करते आणि हिंदूंविषयी त्यांचा द्वेष स्पष्ट करते. कालांतराने वाद इतका वाढला की डंकन प्रायमरी बॅलेटसाठी आवश्यक समर्थन मिळवूच शकले नाहीत आणि त्यांची उमेदवारी सुरुवातीलाच संपुष्टात आली.(Alexander Duncan)
 
 
Powered By Sangraha 9.0