ठाणे जिल्हा सर्वेक्षण समितीच्या शासकीय सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण

11 Dec 2025 15:53:10
 
ID Cards Distributed
 
ठाणे : ( ID Cards Distributed ) महाराष्ट्र शासनाच्या ठाणे जिल्हा सर्वेक्षण समिती तसेच उपविभागीय स्तरीय मॅन्युअल स्केव्हेंजर्स समितीच्या शासकीय सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण समाज कल्याण विभाग, ठाणे येथे करण्यात आले. सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम समाज कल्याण ठाणे कार्यालयात सहायक आयुक्त समाधान इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
 
नरेश भगवाने, रिना चंडालिया, सोनाली अफसर मंगवाना, शितल बनसौडे, विनिता गंभीर आणि सोनी चौहान यांना वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तथा शासकीय सदस्य म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
 
हेही वाचा : कार्तिगाई दीपम वादावर उच्च अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
 
सदस्यांच्या म्हणण्यानुसार, समितीतील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही ओळखपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0