Hindutva : हिंदुत्व ही भारताची ओळख आहे : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

11 Dec 2025 14:57:27
Hindutva
 
मुंबई : (Hindutva) "हिंदुत्व ही भारताची ओळख आहे आणि ती केवळ धार्मिक नव्हे तर भौतिक ओळखही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्व (Hindutva) हीच भारताची ओळख या मंत्राला आधार मानून संघाची वाटचाल केली आणि हीच संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाची प्रेरणा आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उत्तराखंडच्या रुद्रपुर येथील जेसीज पब्लिक स्कूल सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांत संघचालक डॉ. बहादूरसिंह बिष्ट हे देखील उपस्थित होते.(Hindutva)
 
उपस्थितांना संबोधत सरकार्यवाह म्हणाले, संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेक क्रांतिकारकांना सहकार्य केले. परंतु त्यांच्या मनात सतत एकच विचार होता, तो म्हणजे भारत हे प्राचीन राष्ट्र आहे, भौतिक व आध्यात्मिक क्षेत्रात उन्नत राहिलेला आहे. येथे कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती; तरीही आपण वारंवार का पराभूत होत गेलो आणि आपल्या समाजात मानसिक व बौद्धिक गुलामगिरीची प्रवृत्ती कशी निर्माण झाली? ही मानसिकता बदलायची म्हणून डॉ. हेडगेवारांनी संकल्प केला की शाखेच्या माध्यमातून हिंदू समाजाची शक्ती संघटित करायची. शाखा हे असे तंत्र त्यांनी दिले ज्याद्वारे संघाने व्यक्तीनिर्मितीचे कार्य सुरू केले.(Hindutva)
 
हेही वाचा : Fruit Crop Insurance Scheme : फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी मुदतवाढ
 
पुढे ते म्हणाले की, संघ फक्त व्यक्तीनिर्मितीचे कार्य करतो आणि स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असतात. स्वयंसेवकांनी समाजात विविध क्षेत्रांत अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. याशिवाय देशभरात आज एक लाखांहून अधिक सेवा प्रकल्प चालू आहेत. संघ जे काही करत आहे ते समाजाच्या सहकार्यानेच करत आहे आणि ज्याच्यात राष्ट्रभाव जागृत होतो ती व्यक्ती संघाच्या सेवा कार्याशी जोडली जाते.(Hindutva)
 
 
Powered By Sangraha 9.0