UBT Vs Congress : विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद!

10 Dec 2025 11:52:05
 
UBT Vs Congress
 
मुंबई : (UBT Vs Congress) नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून, आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (UBT Vs Congress) चांगलाच वाद भडकल्याची माहिती समोर येत आहे. विधीमंडळात ठाकरेंच्या २० पैकी १४ आमदारांची आसन व्यवस्था पुढील जागेत असल्यामुळे काँग्रेसच्या (UBT Vs Congress) आमदारांना मागे बसाव लागत आहे, त्यामुळेच हा वाद सुरू झाला असल्याच माध्यमांवरून समजत आहे.
 
हेही वाचा :  ट्रम्पच्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीमुळे युरोप ‘आगीतून फुफाट्यात!’
 
माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या २० पैकी १४ कनिष्ठ आमदारांसाठी विधिमंडळात पुढील जागेत आसन व्यवसथा करण्यात आली असल्यामुळे, काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांना मागे बसाव लागत असल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात येत होती. आता या तक्रारीनंतर काँग्रेसच्या सहा आमदारांसाठी पुढे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हा वाद अद्याप संपला नसल्याची चिन्ह दिसत आहेत. (UBT Vs Congress)
  
Powered By Sangraha 9.0