नागपूर : (Dispute between Ubatha and Congress) हिवाळी अधिवेशन, नागपूर विधान भवन मधील आसन व्यवस्थेवरुन उबाठा आणि काँग्रेसच्या आमदारांच्यात वाद (Dispute between Ubatha and Congress) निर्माण झाला आहे. उबाठाच्या २० पैकी १४ आमदारांना तर काँग्रेसच्या १६ पैकी ४ च आमदारांना पुढे जागा आहे. यावरून ही वादाची ठिणगी पडली असून काँग्रेसची ज्येष्ठ आमदारांना उबाठाच्या ज्युनिअर आमदारांच्या मागे बसाव लागत आहे. याबाबत बुधवार दि. १० रोजी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे.(Dispute between Ubatha and Congress)
हेही वाचा : "नेहरू पंतप्रधान झाले, ही देशातील पहिली मतचोरी!", केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सुनावले खासदार राहुल गांधींना खडेबोल
" सभागृहात कोण कुठे बसतो यापेक्षा ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले त्या जनतेचे प्रश्न किती मांडतात याला महत्व आहे. काँग्रेसचे आणि उबाठा चे आमदार खुर्चीसाठी किती हपापलेले आहेत हे आज दिसले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातव्या रांगेत बसले होते. कधी त्यांनी तक्रार केली नाही. आताचे विरोधी पक्षातील आमदार मानसिक नैराश्यात आहेत. लहान मुलासारखे खुर्चीसाठी भांडतात म्हणूनच जनतेने यांना घरी बसवले." अशी टिप्पणी भाजपा आमदार राम कदम यांनी यावर बोलताना केली.(Dispute between Ubatha and Congress)