Project Samanita : कल्याणमधील ट्रान्सजेंडर समुदायाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी ‘प्रोजेक्ट समनिता’चे उद्घाटन

10 Dec 2025 14:06:33
Project Samanita
 
ठाणे : (Project Samanita) कल्याण येथील किन्नर अस्मिता परिसरात वास्तव्यास असलेल्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांच्या राहणीमानात व स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्स व रोटरी क्लब ऑफ भिवंडी बीकेसी यांच्या वतीने ‘प्रोजेक्ट समनिता’ (Project Samanita)या जिल्हा अनुदान प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. (Project Samanita) या प्रकल्पांतर्गत असुरक्षित विद्युत वायरिंगचे संपूर्ण नूतनीकरण, मोठ्या प्रमाणातील गळती दुरुस्ती, शौचालय व वॉशरूमचे संपूर्ण अद्ययावतीकरण, सुधारित फ्लोअरिंग, आधुनिक प्रकाशयोजना तसेच सुरक्षित, स्वच्छ व सन्मानजनक राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा लाभ ३० हून अधिक ट्रान्सजेंडर समुदायातील सदस्यांना होणार आहे.(Project Samanita)
 
गेल्या वर्षी रक्षाबंधन साजरे करण्यासाठी व सीपीआर प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी क्लबच्या सदस्यांनी किन्नर अस्मिता येथे भेट दिली असता, रहिवाशांच्या अत्यंत कठीण जीवनस्थितीचे निरीक्षण झाले. त्याच वेळी या सामाजिक परिवर्तनकारी उपक्रमाची संकल्पना साकार झाली.(Project Samanita)
 
हेही वाचा : Health Security and National Security Cess 2025 : ‘आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' या विधेयकामुळे दहशतवाद आणि कर्करोगाचा बिमोड होईल : खासदार नरेश म्हस्के
 
या उपक्रमासाठी उदार देणगीदारांनी तसेच ठाणे नॉर्थ स्टार ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले. या प्रकल्पाचे उद्घाटन निवृत्त दिनेश मेहता, जिल्हा गव्हर्नर (रोटरी वर्ष २०२४–२५) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्योती मेहता, कॅप्टन प्रसाद तेंडुलकर (डीजीएससी व सीएसआर चेअर, रोटरी वर्ष २०२४–२५), दोन्ही रोटरी क्लबचे सदस्य, मान्यवर पाहुणे तसेच ट्रान्सजेंडर समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Project Samanita)
 
सोहिणी दाम, अध्यक्ष (रोटरी वर्ष २०२४–२५), रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्स आणि हृषीकेश एस. पाटील, अध्यक्ष (रोटरी वर्ष २०२४–२५), रोटरी क्लब ऑफ भिवंडी बीकेसी यांनी सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानत समाजातील वंचित घटकांसाठी समावेशक व सेवाभावी कार्य करण्याची क्लबची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ट्रान्सजेंडर समुदायासाठी अन्नदान करण्यात आले तसेच किन्नर अस्मिता येथील रहिवाशांना दोन्ही क्लबच्या वतीने फ्लोअर मॅट्सचे वितरण करण्यात आले.(Project Samanita)
 
 
Powered By Sangraha 9.0