नागपूर : (CM Devendra Fadnavis) गुटखा विक्रीला आळा बसण्याकरिता कायद्यात बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याबाबत दुरुस्ती करण्यात येईल. तसेच शाळा-महाविद्यायलांच्या परिसरातील अवैध गुटख्याच्या दुकानांवरही कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा, विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. कायद्यातील तरतुदींनुसार 'हार्म आणि हर्ट' हे दोन्ही घटक असल्याशिवाय हा कायदा लागत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
पुनर्वसन केंद्रांसाठी पुढाकार घेणार
तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : UBT Vs Congress : विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद!
कोणत्या जिल्ह्यात किती गुन्हे दाखल?
गुटखा, मावा, सिगारेट, सुपारी, पान मसाला आणि चरस-गांजाच्या विक्रीबाबत नवी मुंबईत १ हजार १४४, अहिल्यानगर येथे १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलढाणा ६३४, नागपूर ४९ आणि यवतमाळ जिल्ह्यात १ हजार ७०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (CM Devendra Fadnavis)
शाळा-महाविद्यालय परिसरातील टपऱ्या उध्वस्त करणार - गृहराज्यमंत्री पंकज भोयर
"गुटखा विक्रीवर बंदी असतानासुद्धा काही ठिकाणी अवैध पद्धतीने गुटखा विक्री होते. यावर संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्वत: यासंदर्भातील आढावा घेतला असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकाने उध्वस्त करण्याकरिता त्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. तसेच याबाबत लोकप्रतिनिधींना माहिती देण्याकरिता तातडीने पोलिस आयुक्तांना निर्देश देऊन ती माहिती देण्यात येईल. लवकरात लवकर सर्व लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती देण्यात येईल." (CM Devendra Fadnavis)