Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम अंतर्गत इंदुरीकर महाराज यांचे किर्तन

10 Dec 2025 16:02:59
 
Chief Minister

ठाणे : (Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या (Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission) प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामस्तरावर जनजागृती वाढवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष जनजागृती कार्यक्रमांतर्गत ह. भ. प. निरुपणकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.(Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission)
  
हा कीर्तन कार्यक्रम दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत शिवाजीराव जोंधळे कॉलेज, पार्थसारथी पेट्रोल पंपाजवळ, महामार्ग क्र. ३ लगत, मुक्काम आसनगाव, ता. शहापूर, जि. ठाणे या ठिकाणी संपन्न होणार आहे.(Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission)
 
हेही वाचा : तिरुपती देवस्थानमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस
 
या उपक्रमाचा उद्देश ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करणे, विकास योजनांची माहिती देणे, शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळवून देणे आणि सामाजिक बांधिलकी दृढ क रणे हा आहे. इंदुरीकर महाराज यांच्या प्रभावी, विनोदी आणि संदेशप्रधान शैलीमुळे नागरिकांमध्ये जनजागृतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.(Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission)
 
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सभासद, महिला बचत गट, ग्रामस्थ नागरिक यांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिकाधिक ग्रामस्थांनी उपस्थित राहून या जनजागृती उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.(Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Mission)
 
Powered By Sangraha 9.0