मुंबई : (IndiGo) इंडिगो विमान कंपनीने आपल्या वेळापत्रकाचे पालन कार्यक्षमतेने न केल्याबद्दल त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये विमानांची उड्डाणे ५ टक्क्यांनी कमी करण्याचे नागरी विमान वाहतूक (IndiGo) महासंचालनालयाचे निर्देश देण्यात आले आहे. इंडिगोने (IndiGo) दि.१० डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपले सुधारित वेळापत्रक सादर करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे.(IndiGo)
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोला (IndiGo) मंजूर करण्यात आलेल्या हिवाळी वेळापत्रक २०२५ची मोठ्या प्रमाणातील फ्लाइट रद्दीकरणांच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. डीजीसीएद्वारे जारी करण्यात आलेल्या हिवाळी वेळापत्रक २०२५नुसार, इंडिगोला प्रति आठवड्यात १५,०१४ उड्डाणांची मंजुरीला देण्यात आली होती, ज्यामुळे नोव्हेंबर २०२५ या महिन्यासाठी एकूण ६४,३४६ उड्डाणांची मंजूरी देण्यात आली होती.(IndiGo)
हेही वाचा : Uran-Nerul Railway : उरण-नेरूळ रेल्वे फेऱ्यांत वाढ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आमदार महेश बालदी यांनी मानले आभार
मात्र, इंडिगोने (IndiGo) सादर केलेल्या कार्यकारी माहितीप्रमाणे असे आढळून आले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये इंडिगोची (IndiGo) प्रत्यक्षात ५९,४३८ उड्डाणे पार पडली असून, या महिन्यात ९५१ उड्डाण रद्द झाल्याची नोंद आहे. समर वेळापत्रक २०२५ (एसएस२५)च्या तुलनेत, इंडिगोला वेळापत्रकात ६टक्के वाढ मंजूर करण्यात आली होती. जिथे उपलब्ध विमानांची संख्या एसएस२५मधील ३५१च्या तुलनेत ४०३ होती. तथापि,असे आढळून आले आहे की एअरलाईन ऑक्टोबर २०२५ मध्ये फक्त ३३९ विमाने आणि नोव्हेंबर २०२५मध्ये ३४४ विमानेच कार्यरत ठेवू शकली, अशी डीजीसीएने आपल्या पात्रात नमूद केले आहे.(IndiGo)
वरीलप्रमाणे, असे निष्पन्न होते की इंडिगोने (IndiGo) आपली उड्डाणसंख्या हिवाळी वेळापत्रक २०२४ (WS 24) च्या तुलनेत ९.६६% आणि समर वेळापत्रक २०२५ (SS 25) च्या तुलनेत ६.०९% वाढविली आहे. परंतु, वाढीव क्षमतेचा कार्यक्षम वापर करण्यात एअरलाईनला अपयश आले आहे. त्यामुळे, विशेषतः मध्यम-अंतर, उच्च-वारंवारतेच्या उड्डाणांमध्ये आणि एका सेक्टरमध्ये एकच उड्डाण होणार नाही याची खात्री करण्यासाठी इंडिगोने (IndiGo) आपले वेळापत्रक 5 टक्क्यांनी कमी करावे, असे निर्देशित करण्यात येते. तसेच, आपणास दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करणे आवश्यक आहे अशी डीजीसीएच्या सूचना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने जारी करण्यात आली आहे.(IndiGo)