Health Security and National Security Cess 2025 : ‘आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' या विधेयकामुळे दहशतवाद आणि कर्करोगाचा बिमोड होईल : खासदार नरेश म्हस्के

10 Dec 2025 14:02:09
Health Security and National Security Cess 2025
 
ठाणे : (Health Security and National Security Cess 2025) ‘आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' (Health Security and National Security Cess 2025) या विधेयकातील उपकरामुळे तंबाखुजन्य उत्पादांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. परिणामी त्याची विक्री कमी होईल. या उपकरातून निर्माण होणारा पैसा हा भारताच्या एकत्रित निधीत जमा होईल. संसदेच्या मंजुरीनंतर तो फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य योजनांसाठी वापरला जाणार आहे. या निधीतून नवीन वैद्यकीय महाविद्यालये व आधुनिक शस्त्रे खरेदी केली जाणार आहे. या विधेयकामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद तसेच कर्करोगाचा बिमोड यामुळे होणार असल्याचे प्रतिपदान खासदार नरेश म्हस्के केले.(Health Security and National Security Cess 2025)
  
हिवाळी अधिवेशनात संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ‘आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' (Health Security and National Security Cess 2025) हे विधेयक सादर केले. या विधेयकावर चर्चा करतांना खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने विधेयकाचे स्वागत करत चर्चेत भाग घेतला. सादर झालेल्या विधेयकाचा अर्थ निरोगी भारत, सुरक्षित भारत आणि विकसित भारत असल्याचे सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे विशेष आभार मानले.(Health Security and National Security Cess 2025)
 
हेही वाचा :  CM Devendra Fadnavis : कायद्यात बदल करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लावणार
 
पूर्वी ‘उत्पादन' वर कर आकारला जात होता. ज्यामुळे करचुकवेगिरी होत होती. आता या नवीन विधेयकामुळे गुटखा आणि पानमसाले सारख्या हानिकारक तंबाखूजन्य उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांतील यंत्रसामुग्रीच्या क्षमतेनुसार उपकर आकारला जाणार आहे. हा केवळ महसुलाचा प्रश्न नाही तर मानवतेचाही आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखूचा ग्राहक आहे. दरवर्षी आपल्या देशात १.३५ दशलक्ष लोक तंबाखूमुळे मरतात. भारतात दर तासाला ५ लोक तोंडाच्या कर्करोगाने मरतात. जेव्हा पान मसाला आणि गुटखा महाग होतील तेव्हा त्यांचा वापर कमी होईल. या करातून मिळणारा पैसा एम्स बांधण्यासाठी, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी आणि आपल्या आयुष्मान भारत लाभार्थ्यांवर उपचार करण्यासाठी खर्च केला जाईल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.(Health Security and National Security Cess 2025)
 
आज देशात २३ एम्स आणि २,०४५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. एमबीबीएसच्या जागा ५१,००० वरून १.१८ लाख झाल्या आहेत. हे पैसे भविष्यातील डॉक्टर तयार करण्यासाठी वापरले जातील, जे उद्या आपले आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करतील. हे विधेयक पंतप्रधान मोदींच्या 'विकसित भारताच्या' प्रतिज्ञेची पूर्तता करेल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.(Health Security and National Security Cess 2025)
 
 
Powered By Sangraha 9.0