मुंबई : ( Diwali ) भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेमध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. दि. १० डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीच्या वार्षिक बैठकीमध्ये भारताच्या दिवाळी या सणाचा सांस्कृतिक वारश्याच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. बैठकीतील निर्णयनंतर राजधानीसह संपूर्ण भारतामध्ये आनंदाची लाट पसल्याचे बघायाला मिळाले. अमूर्त सांस्कृतिक वारश्याच्या यादीमध्ये अशा ज्ञान पद्धती, अभिव्यक्ती, वस्तू आणि जागांचा समावेश केला जातो ज्या त्या त्या विशिष्ठ समुदायाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असतात.
सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दिवाळीचे नाव समाविष्ट केल्यानंतर आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की
" दिपावली आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. हा सण म्हणजे प्रकाश आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दीपावलीचा समावेश केल्याने या उत्सवाची जागतिक लोकप्रियता आणखी वाढेल." केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीत रुजलेल्या वैश्विक कल्याणाचा संदेश जागतिक व्यासपीठांवर अतुलनीय सन्मानाने पोहोचवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपली संस्कृती, आपला वारसा आणि आपले पवित्र सण मानवता, अध्यात्म आणि वैश्विक सौहार्दाचे प्रतीक म्हणून उदयास येत आहेत.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की " दिवाळी या सणाचा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जागतिक स्तरावर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो."
अमूर्त सांस्कृतिक वारश्याच्या दर्जा मिळण्याचे महत्व काय ?
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्यामुळे केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील विविध समुदायांद्वारे साजरा केला जाणाऱ्या या सणाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्य जागतिक पटलावर अधोरेखित होणार आहे.
भारताच्या सांस्कृतिक वैभवाची यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाईलच, मात्र त्याचबरोबर या मानांकनाचा उद्देश भावी पिढ्यांसाठी हा उत्स व व त्याच्याशी संबंधित परंपरा, कौशल्य यांचे संरक्षण करणे हा आहे. वारश्याचा दर्जा मिळाल्यामुळे आंतरसांस्कृतिक संवादाला चालना मिळते.
युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट असलेले भारताचे संस्कृतीसंचित
वेदमंत्र पठण संस्कृती (२००८), कुटियट्टम, संस्कृत नाट्य (२००८), रामलीला (२००८), राममन उतस्व (२००९), मुदियेट्टु
केरळमधील विधी नाट्य आणि नृत्यनाटिका(२०१०), छाऊ नृत्य (२०१०), कालबेलिया लोकगीते आणि नृत्य (२०१०), लडाखमधील बौद्ध मंत्रांचे पठण (२०१२), संकीर्तन, मणिपूरचे विधी गायन, ढोल-वादन आणि नृत्य (२०१३), पंजाबमधील जंडियाला गुरू येथील थथेरा समाजामधील पितळ आणि तांब्याची भांडी बनवण्याची पारंपरिक कला (२०१४), योग (२०१६), नवरोज (२०१६), कुंभमेळा (२०१७), कोलकाता येथील दुर्गा पूजा (२०२१), गरबा (२०२३), दिवाळी (२०२५)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.