मुंबई : (Body Cameras for Traffic Police) वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करायची असेल, तर आता महाराष्ट्रात देखील वाहतूक पोलीसांकडे बॉडी कॅमेरा असले अनिवार्य असणार आहे. म्हणजेच बॉडी कॅमेरा (Body Cameras for Traffic Police) नसेल, तर वाहतूक पोलीसांना ई-चलनाची कारवाई करता येणार नाही. यापूर्वी हा नियम केवळ गोव्यातील वाहतूक पोलीसांसाठी होता. मात्र आता महाराष्ट्रातही काही प्रमुख शहरात टप्प्याटप्प्याने हा नियम करण्यात येणार असल्याची, घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलत असताना केली आहे. (Body Cameras for Traffic Police)
विधानपरिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ई-चलनची कारवाई करत असताना अनेकदा वाहनचालक आणि वाहतूक पोलीसांमध्ये वाद होतात. बॉडी कॅमेरा (Body Cameras for Traffic Police) असले तर, अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच भविष्यात एखादा वाद झाल्यास त्यावर निर्वाळा करणे सोपे होऊ शकते." (Body Cameras for Traffic Police)
त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पार्किंगच्या समस्येवरही भाष्य केले. ते म्हणाले, "डीसीआरमध्ये विकास आराखडा दुचाकीच्या पार्किंगवर लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आज मुंबई सारख्या शहरात लोक दिसेल तिथे दुचाकी पार्किंग करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून यापुढे मुंबई महानगरपालिकेला निर्देश देऊन त्याप्रमाणे डीसीआरमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत." (Body Cameras for Traffic Police)