मुंबई : (Dutta Joshi) रविवारी पुण्यात `एकशः सम्पत` या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक दत्ता जोशी यांनी एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी कार्यक्रमस्थळी पुस्तक विक्रीची सेल्फ सर्विस ठेवली होती. म्हणजेच पुस्तकाच्या प्रती विक्रीसाठी ठेवल्या होत्या मात्र काऊंटरवर कुणाही व्यक्तीला विक्रेता म्हणून उभे केले नव्हते. (Dutta Joshi)
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी काउंटरवर एक निवेदन लिहून ठेवले होते की, पुस्तकाचे मूल्य शंभर रूपये आहे. वाचकांनी हवी तेवढी पुस्तके घ्यावीत. ज्यांना रोखीने पैसै द्यायचे आहेत त्यांच्यासाठी एक डबा ठेवला आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन पद्दतीने पैसे द्यायचे आहेत त्यांच्यासाठी एक क्यूआर कोड ठेवला आहे. वाचकांनी आपापल्या पद्दतीने पैसे पाठवून पुस्तके घ्यावीत. (Dutta Joshi)
लेखकाने केलेल्या या प्रयोगाची यशस्विता म्हणजे तिथली सुमारे १०३ पुस्तके विक्री झाली. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विक्री झालेल्या सर्व पुस्तकांचे पैसे जमा झाले. एकाही पुस्तकाचा हिशोब चुकला नाही. त्यामुळेच या घटनेतून संघाचा संस्कार दिसून येतो. (Dutta Joshi)
हेही वाचा : World Human Rights Day : जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त द. एन. एस. अंध उद्योग गृहातील मुलांना अन्न वाटप
संघाचा विचार जाण्यात मला आनंद होता
संघ वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाने केलेले विविध प्रयोग आहेत. संघाचे सर्व स्वयंसेवक त्यांच्या क्षेत्रात विविध प्रयोग करत असतात. त्यामुळेच हा प्रयोग मी केला. सुरूवातीला माझ्या प्रास्ताविकेत मी सर्व वाचकांना सांगितले की, काउंटरवर विक्रीसाठी पुस्तके असतील मात्र विक्रेता नसेल, ज्यांना जितकी पुस्तके हवी आहेत तेवढी घ्या आणि पैसे रोख असतील तर डब्यात ठेवा ऑनलाईन असतील तर यूपीआय वापरा. यामागे मी हा देखील विचार केला की, ४\५ पुस्तके विनापैशाची घेतली जातील. मात्र संघाचा विचार अशा पद्दतीने जात असेल तर त्यातही मला आनंद होता. परंतु पुण्यातील वाचकांनी मी केलेला विचार चुकीचा ठरवला. (Dutta Joshi)
दत्ता जोशी
लेखक, पत्रकार