Gadchiroli Naxalite Surrender : गडचिरोलीत ‎११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकली शस्त्रे

10 Dec 2025 15:46:53

Gadchiroli Naxalite Surrender


मुंबई : (Gadchiroli Naxalite Surrender)
गडचिरोली येथे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. १० डिसेंबर रोजी तब्बल ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश असून महाराष्ट्रासह छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. (Gadchiroli Naxalite Surrender)

यामध्ये २ डिव्हिजनल कमिटी सदस्य, ३ प्लाटून कमिटी सदस्य, २ एरिया कमिटी सदस्य आणि ४ दलम सदस्य अशा उच्च पदावरील नक्षल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने या नक्षलवाद्यांवर एकूण ८२ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. यापैकी चार नक्षलवादी शस्त्रांसह आणि पूर्ण गणवेशात आत्मसमर्पण हजर होते. (Gadchiroli Naxalite Surrender)

कार्यक्रमास अपर महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, साईकार्तिक, अनिकेत हिरडे तसेच अभियानात सहभागी अधिकारी जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी-६० कमांडो पथकातल्या जवानांचाही यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासनाच्या विविध योजनांची मार्गदर्शिका पुस्तकाचे रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात अनावरण आले. (Gadchiroli Naxalite Surrender)




Powered By Sangraha 9.0