मुंबई : (Hindu Conversions) मुंबईच्या परळ भागातील ना. म. जोशी विद्या संकुल, सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल येथे ख्रिश्चन पाद्रींकडून अवैध धर्मांतरण (Hindu Conversions) होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक आणि हिंदू संघटनांनी रविवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता या शाळेत धाड टाकली. यावेळी, तिथे मार्टिन नावाचा पाद्री हिंदू नागरिकांकडून येशूची प्रार्थना करून घेत असल्याचे आढळले. त्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबतची रितसर तक्रार नोंद करण्यात आली.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून याठिकाणी हे धर्मांतर (Hindu Conversions) चालू आहे. दर रविवारी शाळेला सुटी असल्याने सकाळी 7, 11 आणि दुपारी 3 वाजता शाळेच्या एका वर्गात हिंदूंना जमा करून त्यांच्याकडून येशूची प्रार्थना करून घेतली जात होती. तसेच, “तुमच्या देवापेक्षा या देवाची प्रार्थना करा; सर्व पापांतून मुक्त व्हाल,” अशी खोटी आणि फसवणारी माहिती देऊन भोळ्या-भाबड्या लोकांचे धर्मपरिवर्तन केले जात होते. (Hindu Conversions)
याबाबत परळ विभाग धर्मजागरण समन्वयमार्फत दि. 17 नोव्हेंबर रोजी सदर शाळेला आणि पोलिसांना रीतसर पत्र देण्यात आले होते. परंतु, या रविवारी पुन्हा हा प्रकार आढळल्याने संतप्त नागरिक आणि हिंदू संघटनांनी कारवाई केली.(Hindu Conversions)
पोलिसांनी आता तरी कारवाई करावी
परळ परिसरात अनेक ठिकाणी असे अवैध धर्मांतरण चालू आहे. गेल्या काही वर्षांपासून या शाळेत हा प्रकार चालू होता. या आठवड्यातच यासंबंधी तक्रार त्या शाळेत आणि पोलिसांत केली होती. मात्र, दोघांकडूनही कोणतीच कारवाई न झाल्याने आम्हालाच यावर कारवाई करावी लागली. आम्ही भोईवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आतातरी या घटनेवर सखोल चौकशी करून कारवाई करावी.(Hindu Conversions)
- रोहित माने, तक्रारदार
हेही वाचा : Arun Kumar : संघ ही समाजातील संघटना नाही, तर समाजाची संघटना आहे
मुंबईतील धर्मांतरे थांबवावीत
परळ विभागातील धर्मजागरण समन्वयच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतरही ही अवैध घटना थांबली नसल्याने रविवारच्या प्रार्थना सभेत पोलिसांना बोलावले. त्यानंतर पाद्री माटन याच्यासह 13 ते 15 लोकांना भोईवाडा ठाण्यात नेले. स्थानिकांच्या मदतीने गुन्हा दाखल केला आहे. सरकार आणि प्रशासनाने मुंबईतील धर्मांतरे थांबवावीत.(Hindu Conversions)
- रवींद्र दाभोळकर, धर्म जागरण सहसंयोजक, परळ
गोरगरिबांना हिंदू धर्मापासून वेगळे करून प्रार्थना करायला भाग पाडतात
आमच्या भागात गेल्या काही दिवसांपासून शाळेत धर्मांतरणाचा प्रकार चालू आहे. गोरगरिबांना आणून त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे केले जात होते. त्यामध्ये बाजूच्या टाटा रुग्णालयातील पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना आणून येशूची प्रार्थना करायला भाग पाडले जात होते. “तुमचे आजार डॉक्टर नाही, तर येशू बरे करू शकतो,” असे सांगितले जाते. स्थानिकांना याचा त्रास होत असल्याने याबाबत हिंदू संघटनांना कळवले, त्यांनी याचा पुढे पाठपुरावा केला.(Hindu Conversions)
- अभिषेक पंड्या, स्थानिक