KEM Hospital : ‌‘केईएम‌’मध्ये अत्याधुनिक ‌‘स्पोर्ट्स क्लिनिक‌’

01 Dec 2025 16:14:00
KEM Hospital
 
मुंबई : (KEM Hospital) केईएम रुग्णालयाच्या 12व्या मजल्यावर अत्याधुनिक ‌‘स्पोर्ट्स क्लिनिक‌’ उभारण्यात आले असून जखमी खेळाडू आणि दीर्घकालीन स्नायूंच्या दुखण्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बाहेर खासगी रुग्णालयांत साधारण दीड ते पाच लाख रुपये खर्च येणाऱ्या स्पोर्ट्स सर्जरी येथे रुग्णांवर पूर्णपणे मोफत केल्या जातील. त्याचप्रमाणे पुनर्वसनाची (रिहॅब) प्रक्रिया बाहेर एका सेशनला साधारण पाच हजार रुपये खर्चाची असते; मात्र केईएममध्ये ही सेवाही विनामूल्य मिळणार आहे, अशी माहितीसूत्रांनी दिली.(KEM Hospital)
 
केईएममधील (KEM Hospital) हे अत्याधुनिक स्पोर्ट्स क्लिनिक जखमी खेळाडूंपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांसाठी एक वरदान ठरणार आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि अनुभवी वैद्यकीय चमू यामुळे हे केंद्र शहरातील ‌‘स्पोर्ट्स मेडिसिन‌’ क्षेत्रासाठी एक नवीन मापदंड ठरणार आहे.(KEM Hospital)
 
केंद्रात कोणत्या सुविधा मिळणार?
 
या केंद्रात वातानुकूलित वॉर्ड, तीन स्वतंत्र ऑपरेशन थिएटर आणि 25 बेडचा ‌’‌‘रिहॅब वॉर्ड‌’ तयार केला आहे. ‌‘ॲण्टी-ग्रॅविटी ट्रेडमिल‌’, ‌‘थ्रीडी मोशन ॲनालिसिस‌’, ‌‘गेट-ॲनालिसिस सिस्टम‌’, ‌‘हायड्रोथेरपी पूल‌’, ‌‘हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी‌’ आणि आधुनिक फिजिओथेरपी यांसारख्या सुविधा आहेत.(KEM Hospital)
या तंत्रज्ञानामुळे खेळाडूंच्या हालचालींचे अचूक विलेषण करून जखमांचे कारण ओळखता येते. त्यानुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करता येते. जखमा लवकर भरून पुन्हा खेळात परतण्यास मदत होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.(KEM Hospital)
 
हेही वाचा : National Herald : राहुल अन् सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ
 
‌‘सीएसआर‌’ निधीतून उभारणी
 
या केंद्राच्या निर्मितीसाठी 24 कोटींचा खर्च आला आहे. हा खर्च ‌‘बीके टायर्स‌’कडून ‌‘सीएसआर‌’ निधीतून करण्यात आला आहे. या पाठबळामुळे केईएममध्ये खासगी रुग्णालयांना लाजवेल, अशी सुविधा उभारली आहे. ज्या सेवांसाठी खासगी रुग्णालयात अवाच्या सव्वा शुल्क आकारले जाते; तिथे सर्वसामान्यांनाही मोफत उपलब्ध होतील.(KEM Hospital)

कोणत्या खेळाडूंना सेवेचा लाभ?
 
या केंद्राचा सर्वाधिक फायदा उदयोन्मुख खेळाडूंना होणार आहे. कुपरेज मैदान, आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि विविध क्रीडाकेंद्रांवर सराव करणाऱ्यांना उपचार, तपासणी आणि पुनर्वसनाची सुविधा मोफत उपलब्ध होईल. गुडघा, खांदा, टाच, पाठीचे दुखणे, स्नायू ओढणे, लिगामेंट दुखापत यांवर उपचार मिळणार आहेत.(KEM Hospital)
 
Powered By Sangraha 9.0