Samantha Prabhu Wedding : समांथा प्रभूने बांधली राज निदिमोरूसोबत लग्नगाठ! लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

01 Dec 2025 17:36:39

सुप्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Prabhu Wedding) हिने चित्रपट निर्माते राज निदिमोरू यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्यांच्या लग्न समारंभाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रविवारी रात्री उशिरापासून समांथा आणि राजच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्या होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.


सोमवारी सकाळी समांथा आणि राजने जवळची मित्र मंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थित ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात लग्नगाठ बांधली


समांथाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. मात्र आता समांथाच्या चाहत्यांमध्ये राज निदिमोरू कोण आहे? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. (Samantha Prabhu Wedding)


राज निदिमोरू हा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहे. ४६ वर्षांचा राज निदिमोरू ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा दिग्दर्शक आहे.


राज निदिमोरूचं देखील हे दुसर लग्न असून, श्यामली डे ही त्याची पहिली पत्नी आहे. तर समांथाने ४ वर्षांपूर्वी नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. (Samantha Prabhu Wedding)



Powered By Sangraha 9.0