नवी दिल्ली : (National Herald) ‘नॅशनल हेराल्ड’ खटल्यात नवीन गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्यसभा खा. सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नवीन गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राहुल आणि सोनिया गांधी यांची नावे असून इतर सहाजण आणि तीन कंपन्यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत.(National Herald)
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेल्या एजेएल (असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड) कंपनीवर फसवणूक करून कंपनी बळकावण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून दि. 3 ऑक्टोबर रोजी ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. ‘ईडी’ने आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांबरोबर प्रसिद्ध केला होता. ‘पीएमएलए’च्या ‘कलम 66(2)’अंतर्गत, ‘ईडी’ कोणत्याही एजन्सीला अशा प्रकरणांमध्ये तपास अहवाल आणि पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यास सांगू शकते.(National Herald)
सहाजणांविरोधात गुन्हा दाखल गुन्ह्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख) आणि इतर तीनजणांची नावे आहेत. तसेच, ‘एजेएल’, ‘यंग इंडियन’, ‘डॉटेक्स मर्चंडायज् प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांचीदेखील नावे आहेत.(National Herald)
हेही वाचा : Hindu Conversions : हिंदूंच्या धर्मांतरणासाठी शाळेत प्रार्थना,धाड टाकून संघटनांनीच उधळला डाव
तिन्ही कोलकातास्थित बोगस कंपन्या
‘डॉटेक्स’ ही कोलकातामधील कथित शेल कंपनी असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. या कंपनीने ‘यंग इंडियन’ कंपनीला एक कोटी रुपये दिले होते. या व्यवहाराद्वारे ‘यंग इंडियन’ कंपनीने काँग्रेसला 50 लाख रुपये देऊन तब्बल दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या ‘एजेएल’ कंपनीवर नियंत्रण मिळवले.(National Herald)
‘एफआयआर’मध्ये नमूद असलेल्या तिन्ही कंपन्या कोलकातास्थित बोगस कंपन्या असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस ‘एजेएल’च्या भागधारकांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 2014 मध्ये पटियाला हाऊस कोर्टात नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणात पहिली याचिका दाखल केली होती.