मुंबई : (Virata Ramayana Temple) तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे एका प्रचंड ग्रॅनाइटच्या खडकापासून घडवण्यात आलेले २१० टन वजनाचे, जगातील सर्वात उंच शिवलिंग बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या विराट रामायण मंदिरात (Virata Ramayana Temple) स्थापित केला जाणार आहे. हे मंदिर रामायणाची कथा जिवंत करणारा एक भव्य प्रकल्प आहे आणि हे शिवलिंग त्याचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.(Virata Ramayana Temple)
मिळालेल्या वृत्तानुसार, बंगालच्या उपसागर आणि ग्रेट सॉल्ट लेक यांच्या मधोमध वसलेल्या महाबलीपुरम या छोट्या गावातून हे शिवलिंग प्रस्थान झाले. यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. हे शिवलिंग पूर्णपणे एकाच खडकातून घडवले गेले आहे. या प्रकल्पाशी संबंधित कारागिरांच्या मते, एखाद्या मंदिरात स्थापित होणारा हा जगातील सर्वात मोठा ‘सिंगल-स्टोन’ शिवलिंग आहे. प्रस्थानापूर्वी शिवलिंगाची फूलांनी सजावट करण्यात आली, मंत्रोच्चारांनी त्याचे अभिषेक-पूजन झाले. नंतर हे शिवलिंग बिहारच्या प्रवासासाठी तयार झाले. ळनाडूपासून आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि अखेरीस बिहार असे अनेक राज्ये ओलांडत ते विराट रामायण मंदिरात पोहोचणार आहे.(Virata Ramayana Temple)
हेही वाचा : Assam Government : आसाम सरकारची धडक कारवाई; २००० एकर जमीन केली अतिक्रमणमुक्त
या शिवलिंगाची निर्मिती विराट रामायण मंदिर (Virata Ramayana Temple) ट्रस्टच्या निधीतून करण्यात आली असून, मंदिरात हे शिवलिंग मुख्य पूजा स्थळाचा केंद्रबिंदू असेल. भक्त येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा आहे.(Virata Ramayana Temple)
शिवलिंगाची वैशिष्ट्ये
उंची : ३३ फूट
वजन : २१० मेट्रिक टन
घडण : पूर्णपणे सिंगल ग्रॅनाइट ब्लॉकमधून बनवलेले, कुठेही सांधा नाही.
उत्पत्ती : महाबलीपुरम (तमिळनाडू)
गंतव्य ठिकाण : १२३ एकरमध्ये उभा राहत असलेला बिहारचा विराट रामायण मंदिर
अंतर : २,१०० किमी, तमिळनाडू ते बिहार (अनेक राज्यांमधून जाणारा लांबचा प्रवास)