मुंबई : (Assam Government) आसाममध्ये जंगल आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू असून नागाव जिल्ह्यातील लुटुमारी राखीव जंगलात गेल्या दोन दिवसांत बुलडोझर कारवाईद्वारे ५९६२ बीघा जमीन (सुमारे २००० एकर) मुक्त करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही कारवाई कचुआ लुटुमारी वन्यजीव अभयारण्याच्या चंखोला, कांदापारा, जुरीपार, बेडेरीपार आणि माजगाव या भागांत, कॅम्पूर वन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आली.(Assam Government)
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील मोठ्या प्रमाणातील मौल्यवान झाडे तस्करांनी तोडून जमिनी रिकाम्या केल्या होत्या. त्यानंतर विविध भागांतून लोक येऊन त्या जागेत राहू लागले. अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे १,७०० अल्पसंख्याक कुटुंबांनी अनेक वर्षांत जंगलातील जमीन व्यापली होती, हळूहळू समूह वसाहती उभारल्या होत्या आणि सुपारीची बागायती तसेच इतर शेती करत होते. अनेकांनी वीटांच्या घरांची बांधणी केली होती, तसेच प्रशासनाने वीजपुरवठा आणि शाळादेखील उभ्या केल्या होत्या.(Assam Government)
हेही वाचा : Devendra Fadnavis : कायद्याचा चुकीचा अर्थ लावून निवडणूका पुढे ढकलणे चूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जंगल आणि कुरण क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून लुटुमारी जंगलाला ही कारवाईसाठी निवडण्यात आले. वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने यापूर्वीच बेदखल नोटिसा दिल्या होत्या आणि अनेकांनी त्या मिळाल्यानंतर जागा सोडली होती. तरीही काही कुटुंबे थांबली होती. त्यामुळे अंतिम मुदत संपल्यानंतर शनिवारी आणि रविवारी बुलडोझर्सद्वारे घरे तोडण्यात आली. जिल्हाधिकारी देबाशीष शर्मा यांनी सांगितले की ७०% कुटुंबांनी अंतिम मुदतीपूर्वी स्वेच्छेने जागा रिकामी केली होती. शनिवारी सुमारे १२०० घरे, तर आज उरलेली सुमारे ५०० घरे पाडण्यात आली. प्रशासनाने प्रभावित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक मदत दिली जाईल, असे सांगितले आहे.(Assam Government)
कायद्याच्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चार तात्पुरत्या छावण्यांत ५ हजार पेक्षा जास्त पोलीस जवान तैनात होते. घरे पाडण्यासाठी ५० हून अधिक एक्स्कॅव्हेटर आणि बॅकहो लोडरचा वापर करण्यात आला.(Assam Government)