Ameet Satam : शासनाकडून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला स्थगिती

01 Dec 2025 13:53:56
Ameet Satam
 
मुंबई : (Ameet Satam) राज्य शासनाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम (Ameet Satam) यांनी शिक्षक मंडळाच्या परिषदेमध्ये दिलेला शब्द केला पूर्ण केल्याची भावना मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य डॉ. विशाल कडणे यांनी व्यक्त केली.(Ameet Satam)
 
मुंबईतील हजारो शिक्षकांनी डॉ. विशाल कडणे यांच्या नेतृत्वात दि. २२ नोव्हेंबर रोजी भाजप मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम (Ameet Satam) यांच्याकडे एकमुखाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार लागू होणारी संचमान्यता रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती. या संच मान्यतेमुळे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर दि. २२ नोव्हेंबर रोजी EDUCON-2025 आणि शिक्षण परिषद २०२५ मध्ये डॉ. विशाल कडणे यांनी हे निवेदन प्रत्यक्ष आ. अमीत साटम (Ameet Satam) यांच्याकडे मुंबईतील हजारो शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये सादर केले होते.
 
यापूर्वी अनेक वेळा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सातत्याने बैठका आणि चर्चा करुन सदर विषयाबाबतची गांभीर्यता निर्माण करण्यात मुंबई शहर शिक्षक विकास मंडळास यश आले होते. याबाबतीतील आपली भूमिका मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे प्रवक्ते अनिल मुंढे यांनी गेल्याच आठवड्यात स्पष्ट केली होती. २० नोव्हेंबर नंतर मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अनिल मुंढे, डॉ चंद्रशेखर भारती, भगवान सागर, किशोर मराठे सातत्याने या विषयाबाबत शिक्षण विभागात ठाण मांडून होते. तसेच दै. मुंबई तरुण भारतनेही या विषयाला वारंवार वाचा फोडली.(Ameet Satam)
 
हेही वाचा : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, केंद्र सरकार 'ही' १४ विधेयके सादर करणार  
 
दरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी आ. अमीत साटम (Ameet Satam) यांनी राज्य शासनाकडून अधिकृत आदेश जाहीर करून शिक्षकांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली. नव्याने जाहीर झालेल्या शासन आदेशाप्रमाणे, सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यतेबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्यात असल्याने तसेच सन २०२४-२५ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया डिसेंबर, २०२५ मध्ये राबविणे आणि सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रीया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्व करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रीया राबविण्याऐवजी सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच समायोजन प्रक्रीया करणे योग्य होणार आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांचे स्तरावरुन दि. २० नोव्हेंबर २०२५ च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे.(Ameet Satam)
 
तसेच सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतर विहित कार्यपध्दतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजना करण्यात यावे, असा आदेश शिक्षण आयुक्तांनी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पारित केला.
 
शिक्षकांना दिलासा
 
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई शहरातील सर्व शिक्षकांच्या वतीने मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम (Ameet Satam) यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0