मुंबई : (Supriya Sule) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या पुण्यातील कोरेगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चांगलेच चर्चेत आहेत. यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यांच्यावर सरकारच्या ताब्यात असलेली १८०४ कोटी किंमतीची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत कंपनीत एक टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह खडक पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता याप्रकरणात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "पार्थ पवारचा यात काही संबंध नाही, जमीन खरेदी प्रकरणाचा खुलासा राज्य सरकारनेच केला पाहिजे. पार्थ, रोहित, जय, रेवती ही आमचीच मुले आहेत. ते काही चुकीचे करतील असे वाटत नाही."
पुढे त्या म्हणाल्या, “पार्थला मी फोन केला होता. त्याने सांगितले की, आत्या मी काही चुकीचे केलेले नाही. माझी लिगल टीम यावर उत्तर देईल.” (Supriya Sule)