मुंबई :(Sharad Pawar) पार्थ पवार यांच्या पुण्यातील कोरेगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह खडक पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, पार्थ पवार यांच्यावर सरकारच्या ताब्यात असलेली १८०४ कोटी किंमतीची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराखण?; म्हणाल्या, "त्याचा यात काही संबंध नाही..."
माध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले कि, "कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पार्थ पवार पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करून वास्तव समाजासमोर आणले पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते."
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले कि, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत व्हिव्हीपॅटने (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) मतदान घेतल्यास शंका राहणार नाही." (Sharad Pawar)