मुंबई : (IRCTC) भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) पश्चिम विभाग, मुंबईतर्फे वंदे मातरम् च्या दिडशेव्या वर्धापन दिनानिमित्त देशासोबत उत्साहाने सहभाग नोंदविला.
सकाळी १०:०० वाजता आयआरसीटीसीच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि युनिट्समध्ये वंदे मातरम् हे गीत सादर झाले. यात झोनल ऑफिस (मुंबई), प्रादेशिक कार्यालये - भोपाळ व अहमदाबाद तसेच रेल नीर संयंत्रे - आंबेरनाथ (महाराष्ट्र), मनेरी (मध्य प्रदेश), तसेच क्षेत्रीय कार्यालये - इंदूर, जबलपूर आणि पुणे यांचा समावेश होता. (IRCTC)
हेही वाचा : रंगसृष्टीचा आत्मसंवाद
या उपक्रमाद्वारे आयआरसीटीसीने राष्ट्रीय मूल्ये आणि ऐक्यप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. वंदे मातरम् या गीताच्या अदम्य देशभक्तीच्या भावना आजही भारतीयांच्या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरित करतात, हाच या कार्यक्रमाचा संदेश होता.
या प्रसंगी आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे गटमहाव्यवस्थापक गौरव झा यांनी म्हणाले की, सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने या गायनात सहभाग घेतला आणि राष्ट्रगीत गाताना देशाभिमान व गौरवाची भावना व्यक्त केली. (IRCTC)