BJP Mumbai Election Pattern : भाजपचा आगामी निवडणुकींसाठी नवा पॅटर्न निश्चित! सविस्तर जाणून घ्या

08 Nov 2025 15:29:11
BJP Mumbai Election Pattern
 
 
मुंबई : (BJP Mumbai Election Pattern) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भाजपकडून मुंबईतील उमेदवार निवडीचा नवा पॅटर्न निश्चित करण्यात आला आहे. या पॅटर्ननुसार (BJP Mumbai Election Pattern) भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल, तर निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल. यासाठी पक्षाकडून चांगलीच तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये निरीक्षक नेमले असून, मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांचे रिपोर्टकार्ड तयार केले जाणार आहेत आणि त्यानुसारच उमेदवारी दिली जाणार आहे.
 
हेही वाचा :  Rupali Thombre Patil : रुपाली ठोंबरेंना मोठा धक्का! पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस, ७ दिवसांच्या आत...
 
त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच, माजी नगरसेवकांच्या कामाचे सखोल मोजमाप होणार आहे. वॉर्डमध्ये केलेली कामे, त्यांची परिणामकारकता, पक्षाने दिलेले कार्यक्रम पूर्ण केले आहेत की नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींचे मूल्यांकन केले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे उमेदवारांची सखोल तपासणी करतील. (BJP Mumbai Election Pattern)
 
हे वाचलात का ? : भारत : जगाचे नवे डेट्रॉयट  
 
या मूल्यांकन प्रक्रियेत, उमेदवाराची लोकांमध्ये असलेली प्रतिमा देखील तपासली जाणार आहे. ज्या माजी नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक नसेल, त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. मात्र या नवीन धोरणामुळे तरुण आणि सक्षम उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (BJP Mumbai Election Pattern)
 
 
Powered By Sangraha 9.0