
मराठवाड्यात आम्ही आलोय आणि भाजपच्या महायुती सरकारला ‘दगाबाज रे’ म्हणतोय. हा ‘दगाबाज’ शब्द आमच्या मनात काट्यासारखा रूतला. खरं सांगू का, मला काय म्हणायचं आहे, तर
दिखते हे इंजिन मशाल के साथ
व्होटिंग में जाते कमल के साथ रे
हाय अल्ला ये व्होटर बडे दगाबाज रे
(‘हाय अल्ला’ यासाठी की सध्या या मतदारांचा आम्हाला मोठा आधार वाटतो.) आम्हाला मतदान न करणारे ते मतदार आणि आमच्या पक्षातले ते 40 आमदार पण तसलेच दगाबाज! काय म्हणता खरे दगाबाज आम्ही आहोत? आम्ही भाजपच्या साथीने निवडणूक लढवली आणि सत्तेसाठी शरद पवार आणि राहुल गांधींशी हातमिळवणी केली? मग काय झाले, सत्तेवर येणे महत्त्वाचे. आताही आम्ही मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नावाने आलोय ते कशासाठी?
गेल्या वेळी आम्ही असेच बांधावर गेलो होतो. पावसामुळे जमिनीवर झालेला तो चिखलाचा राडा, ती पावसाची रिपरिप, मला तर जमिनीवर पाय ठेवावासा वाटला नाही. पण, आमच्या सोबतच्यांना माहीत आहे की, दुःखाची, संघर्षाची, वेदनेची एवढीशीपण झळ मला लागलेली नाही. त्यामुळे त्यांनी मग लगेच मला बांधावर जाण्यासाठी ‘रेड कार्पेट’ टाकले. गरजेचे होते ते. तर आता आम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भेटतोय. काय म्हणता, आमच्या वैयक्तिक संपत्ती घरदारातून शेतकऱ्यांना मदत करू? काय म्हणता? मी शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे? हे बघा, मी याआधीच ‘ऑन कॅमेरा’ म्हटलेय की, माझे हात रिकामे आहेत आणि माझ्याकडे देण्यासारखे काही नाही. तसेच मी आधीच म्हटले ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी.’ काय म्हणता? आम्ही काहीही केले तरी असली दगाबाज कोण आहे, हे जनतेला माहीत आहे? असू दे!
आम्हाला काही फरक पडत नाही. आता आमच्यासोबत कोण आहे? तुम्ही विसरलात, यावेळी आमच्यासोबत चुलत बंधुराजे आहेत. काय म्हणता? आम्ही इथे ‘कमळ’वाल्यांना ‘दगाबाज रे’ म्हणेपर्यंत अशीही परिस्थिती येऊ शकते की चुलत बंधुराजे आम्हाला कधीही टाटा करतील? ते त्यांचं ‘इंजिन’ हातात घेऊन ‘तुतारी’ फुंकत मग ‘कमळा’लाही शोधत फिरतील आणि आम्ही त्यांना म्हणू,
‘प्यार झुठा था तो जताया क्यू
ऐसे जाना था तो आया ही क्यू?’
खोटे मतदार हवे राज्यात!
मोहम्मद अली जिना यांच्या ‘मुस्लीम लीग’चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तृणमूल काँग्रेस काम करत आहे. घुसखोरीमुळे प. बंगालमधील सहा हजार गावांची रचना बदलली आहे. या गावात आता एकही हिंदू व्यक्ती राहात नाही आणि या गावात आता एकही मंदिर उरले नाही.” प बंगालचे विरोधी पक्षनेता तसेच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी नुकतेच हे विधान केले. भयंकर! प. बंगालचे हे वास्तव खरे तर हिमनगाचे टोक. ही सहा हजार गावे दिसण्यात आली; पण पटलावर न आलेली अशी असंख्य गावे असतील.
काही दशकातच ही गावे 100 टक्के मुस्लीम लोकसंख्येची कशी झाली असतील? या गावामधले हिंदू कुठे गेले असतील? गावशिव सोडून ते परागंदा का झाले असतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वेदनादायी आणि संतापजनक आहेत. रामनामाचा भयंकर तिटकारा आहे, असे वागणाऱ्या ममता विसरल्या की त्या प. बंगालमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्याही मुख्यमंत्री आहेत. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. उलट संदेशखाली प्रकरणात त्यांच्याच तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने शहाजहाँ शेखने हिंदू असलेल्या मागासवगय गरीब विवाहित तरुणींचे मानसिक आणि लैंगिक शोषण केले होते. या नराधम शहाजहाँ शेखवर कारवाई करण्याऐवजी त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम प. बंगालच्या प्रशासनाने केले, असे आरोप त्यावेळी झाले. आताही ममता बॅनज यांनी मतदारयादी पुनरीक्षणाविरोधात मोर्चा काढला. मृत किंवा दुसऱ्या राज्यात गेलेल्या व्यक्तींची नावे मतदारयादीतून वगळली जाणे, हे काय चुकीचे काम आहे? पण, ममता बॅनजच्या मते, हे चूक आहे. कारण, अर्थातच सरळ आहे. ममता बॅनजना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसेही करून सत्तेवर पुन्हा यायचे आहे. पण, त्यांच्या निष्क्रिय आणि हिंदूविरोधी कार्यप्रणालीवर प. बंगालचे खरे मतदार नाराज आहेत. ते काही तृणमूलला मतदान करणार नाहीत. मग मतदान करणार कोण? तर काही लोकांच्या मते, हे घुसखोर खोटे मतदार! त्यामुळेच मतदारयादी पुनरीक्षणाला विरोध आहे, हे नक्के. घुसखोरी केलेले रोहिंग्या मुसलमान यांचे तुष्टीकरण केले की त्यांची मते मिळणार. त्यामुळे प. बंगालमध्ये चित्र आहे खोटे मतदार हवे राज्यात!