रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारांबद्दल माहिती देणारे डिजिटल व्यासपीठ ‘प्रोप-टायगर डॉट.कॉम’ आणि ‘ऑरम प्रॉपटेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिअल इनसाईट रेसिडेन्शिअल : जुलै-सप्टेंबर 2025’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानिमित्ताने स्वप्नातल्या घरांचे गगनचुंबी दरवाढीचे आकलन करणारा हा लेख...(Real Estate)
गावाकडून शहरांकडे, चाळीतून सदनिकांमध्ये, ‘वन रुम किचन’ ते ‘वन बेडरूम किचन’, अशी स्वप्न सर्वसामान्य माणूस बाळगत असतो. शहरांमध्ये नव्याने येणाऱ्यांना एक सुरक्षित पर्याय म्हणून ‘फ्लॅट संस्कृती’ गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने रुजली. वसतिगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयी, वाढते भाडे आणि जागेचा अभाव याचा एकत्रित परिणाम, पर्यायी गुंतवणूक याचा एकत्रित परिणाम हे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढू लागली. यात देशात शीर्षस्थानी मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या आठ शहरांचा समावेश होतो.(Real Estate)
विशेष म्हणजे, मुंबई आणि एमएमआर प्रदेशातील घरांच्या किमतीत सर्वात कमी वाढ दिसून आली, तर सर्वाधिक किमती दिल्लीतील एनसीआरमध्ये वाढल्या आहेत. दिल्लीकरांना सध्या आलिशान घरांचे वेध लागल्याचे दिसून येते. ज्या कारणास्तव तेथील घरांचा प्रति चौरस फूट दर 8900 रुपये इतका झाला आहे. आजूबाजूच्या परिसरात विणलेले रस्त्यांचे जाळे, राजधानी म्हणून शहरातील असलेली गजबज आणि या भागात असलेले नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (जेवर), द्वारका द्रुतगती महामार्ग ज्यामुळे गुरूग्राम भागांतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि रॅपीड रेल या सार्वजनिक वाहतुकीला चालना देणाऱ्या गतिमान वाहतूक पर्यायांमुळे या भागाला ग्राहकांची पसंती मिळालेली दिसते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांकडे आलिशान घरांची मागणी वाढू लागली, ज्यात 25 ते 30 हजार रुपये चौरस फूटांपर्यंत घरांचे दर पोहोचले आहेत. वाढती कुटुंबवेल, ‘कोविड’ काळानंतर अचानक वाढत चाललेली मागणी, क्लब हाऊस, वर्कस्पेस, जीम्स, पार्किंग, मैदान, बगीचा आणि अन्य तंत्रसुसज्ज अशा सोयींनी सुसज्ज घरांकडे ओढा वाढत चालला आहे.
अनेक गृहनिर्माण कंपन्यांनी या गोष्टींचा गांभीर्याने केलेला विचारही एक तुलनात्मक स्पर्धा निर्माण करतो. घरातील जागेच्या तुलनेत सोबत मिळणाऱ्या सुविधांचे दर जवळपास 30 टक्के इतके आहेत. एनसीआर भागात तर बांधकामसंबंधी सुधारित आणि अद्ययावत कायदे, बिगर बँकिंग संस्थांवरील संकट, ‘कोविड’ काळामुळे छोटे बांधकाम व्यवासायिक या स्पर्धेतून बाद होत गेले. इतर शहरांतही काही अपवाद वगळता हीच स्थिती. याच कारणास्तव दिल्ली एनसीआर भागात घरखरेदीत गतवषच्या तुलनेत 19 टक्के वाढ, तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत 9.8 टक्के इतकी वाढ दिसून येते. त्या खालोखाल बंगळुरूत 15 टक्के, हैदराबादमध्ये 13 टक्के, पुणे, चेन्नईत नऊ टक्के, कोलकाता आणि अहमदाबादमध्ये अनुक्रमे आठ टक्के आणि 7.9 टक्के, तर सर्वांत शेवटी मुंबईत सात टक्क्यांनी गृहखरेदीत वाढ दिसून येते. तसे असले तरीही मुंबई आणि एमएमआर भागातील घरांची किंमत इतर कुठल्याही जागेपेक्षा अधिकच आहे. मुंबईत तर सरासरी घरांच्या किमती 13 हजार प्रतिचौरस फूट इतक्या आहेत. मात्र, दक्षिण मुंबई आणि वांद्रेसारख्या भागांत हेच दर 70 ते 40 हजार प्रतिचौरस फुटांपर्यंत पोहोचलेले. गतवषच्या तुलनेत यंदा घरांच्या किमतीत सुमारे सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआर सारखी मुंबईची स्थिती नाही. मुंबईत जागेची कमतरता पूवपासूनच आहे. त्यासाठीच तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची गरज भासू लागली. त्या कारणास्तव मुंबईत बहुतांश ठिकाणी पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी सुरू आहे.(Real Estate)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून मुंबईत धारावी, बीडीडी चाळ पुनर्विकासासारखे महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प आकाराला येत आहेत. मुंबई आणि महानगरांतील 337 किमीचे मेट्रो जाळे, कोस्टल रोड, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे मुंबईसहीत आसपासच्या शहरांतील घरांची मागणीही वाढू लागली आहे. शिवाय दादर, वांद्रे, घाटकोपर, अंधेरी, चेंबूर आणि वरळी भागांत आता आलिशान टॉवरची मागणी वाढताना दिसते. त्यातच मुद्रांक शुल्कातील सवलत, निर्माणाधीन परवडणाऱ्या घरांवर कमी असलेला जीएसटी दर, ‘रेडी-टू-मूव्ह’ घरांना जीएसटीतून मुक्तता, पंतप्रधान शहरी आवास योजना, स्थिर रेडीरेकनरचे दर, पर्यायी गुंतवणूक म्हणून संपूर्ण क्षेत्राचा केला जाणारा विचार, सातत्याने वृद्धिंगत होणाऱ्या किमती विचारात घेऊन केलेली गुंतवणूक घरांच्या मागणीतील वाढीसाठी पोषक ठरल्याचे म्हणता येईल. मात्र, मुंबईतील घरांच्या किमतींवर याचा फारसा परिणाम जाणवलेला नाही. याचे कारण मुंबईसारख्या शहरांची चमक ही देशभरातील गुंतवणूक आकर्षित करते. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई-एमएमआरनंतर पुण्यातील घरांना मागणी आहे. भविष्यात होऊ घातलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प, नवे विमानतळ, आयटी कंपन्यांचा विस्तार पुण्यातील घरांच्या किमतीतील वाढींसाठी कारणीभूत ठरला. हिंजवाडी, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि औंधसारख्या भागांत दरवष 11 टक्क्यांपर्यंत घरांच्या किमतीतील वाढ अपेक्षित आहे. पुण्यातही मेट्रो प्रकल्पांचा होत असलेला विस्तारही याला कारणीभूत ठरला. शिवाजी नगर, डेक्कन, कोरेगाव पार्क सारख्या भागांत तर 13 ते 25 हजार चौरस फूटांपर्यंत किमती वाढल्या.
एकंदरीत ज्या ज्या भागांत विकास प्रकल्प आणि गुंतवणूक आकर्षित करण्यात सरकारे यशस्वी झाली, तिथल्या घरांच्या किंमतीतील वृद्धी स्पष्ट दिसू लागली आहे.
| शहर |
तिसरी तिमाही 2025 (/चौ.फु.) |
तिसरी तिमाही 2024 (/चौ.फु.) |
वार्षिक वाढ (%) |
दुसरी तिमाही 2025 (/चौ.फु.)
|
तिमाही वाढ (%)
|
| मुंबई महानगर प्रदेश (MMR) |
13,250 |
12,383 |
7.0% |
12,805 |
3.5% |
| दिल्ली-एनसीआर |
8,900 |
7,479 |
19.0% |
8,108 |
9.8%
|
| बंगळुरू |
8,870 |
7,713 |
15.0% |
7,881 |
12.6%
|
|
हैदराबाद 4.6%
|
7,750 |
6,858 |
13.0% |
7,412 |
4.6% |
|
पुणे
|
7,250 |
6,651 |
9.0% |
7,109 |
2.0% |
|
चेन्नई
|
7,173 |
6,581 |
9.0% |
7,225 |
|
|
कोलकता
|
6,060 |
5,611 |
8.0% |
5,839 |
3.8% |