मुंबई : (Kartik Poornima) अस्तिका समाज भगवान कोचु गुरुवायूर कृष्ण मंदिर हे माटुंगा पूर्व, येथील १०२ वर्षे जुने मंदिर आहे, जिथे गुरुवायूर कृष्ण मंदिर, गुरुवायूर, केरळ ह्यांची पारंपरिक पूजा/विधी चालत आली आहे. विश्वस्तांतर्फे भगवान कार्तिक स्वामींच्या भक्तांना कळविण्यात येत आहे की, कार्तिक स्वामींच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी दि. ५ नोव्हेंबर २०२५ पहाटे ५.०० ते दुपारी १.०० पर्यंत व दुपारी २.०० ते रात्रौ ९.०० पर्यंत खुले राहील. कृपया या वेळेतच भाविकांनी भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन आस्तिका समाज मंदिराच्या विश्वस्तांना उपकृत करावे अशी विनंती करण्यात येत आहे.