मुंबई : (Zohran Mamdani) संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी अखेर 'झोहरान ममदानी' (Zohran Mamdani) हे निवडून आले. या निवडणूकीतील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, १८९२ नंतरचे ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिलेच सर्वात तरुण महापौर बनले आहेत. दरम्यान त्यांच्या विजयी भाषणानंतर 'धूम' या ह्ंदी चित्रपटातील 'धूम मचाले' हे गाणे वाजवण्यात आले आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
झोहरान ममदानी (Zohran Mamdani) हे गेल्या वर्षी पहिल्यांदा निवडणुकीच्या शर्यतीत उतरले, तेव्हा लोकं त्यांना फारसं ओळखत नव्हती. त्याबरोबरच त्यांच्याकडे जास्त पैसे किंवा पक्षांचा ठोस पाठिंबाही नव्हता. मात्र त्यांच्या जिद्दीने आज त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस सिल्वा यांच्यासारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं आहे.
दरम्यान, झोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी त्यांचे विजयी भाषण काही क्षणातच संपवले होते, मात्र त्यांच्या भाषणानंतर जनतेकडून ममदानीसाठी (Zohran Mamdani) मोठ्या उत्साहात आवाज करण्यात आला, त्यासोबतच ह्ंदी चित्रपटातील 'धूम मचाले' हे गाणे वाजवण्यात आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.