ST : एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला लवकरच...

05 Nov 2025 18:25:50
ST
 
मुंबई : (ST) राज्यातील एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अखेर 'कणखर’ नेतृत्व मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या महत्त्वाच्या पदावर लवकरच आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा उघड झाला आणि हे पद वर्षानुवर्षे रिक्त असल्याचे समोर आले. याचवेळी परिवहन मंत्री आणि एसटी (ST) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात ठामपणे आश्वासन दिले होते, "एसटीला लवकरच आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळेल.”
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : बंजारा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
या आश्वासनाची पूर्तता आता प्रत्यक्षात येत असून, एसटी (ST) महामंडळाच्या पाठपुराव्याला राज्याच्या गृह खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांनी या नियुक्तीस मान्यता दिल्याने, लवकरच एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अनुभवी, शिस्तप्रिय व कुशल आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून मिळणार आहेत. या निर्णयामुळे एसटीच्या (ST) प्रवाशांचा सुरक्षेवरील विश्वास अधिक दृढ होईल, तर महामंडळाच्या अंतर्गत शिस्तीला नवी धार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0