Salman Khan : सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात! नेमकं प्रकरण काय ?

05 Nov 2025 17:25:13
Salman Khan

मुंबई : (Salman Khan) बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. पण या वेळी कारण थोडं वेगळं आहे. सलमान खान आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या चित्रपटांमुळे, वादग्रस्त विधानांमुळे किंवा कृतींमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडत आला आहे. मात्र या वेळी कारण आहे, पान मसाल्याच्या जाहिरातीचं. राजस्थानच्या कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खानला (Salman Khan) नोटीस बजावली असून त्याच्यावर भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीचा आरोप करण्यात आला आहे.

Salman Khan 
दरम्यान ही तक्रार, राजस्थान उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि राजकीय नेते इंदर मोहन सिंग हनी यांनी दाखल केली आहे. सलमान खानने (Salman Khan) ज्या कंपनीच्या पान मासाल्याच्या जाहिरातीत काम केलं आहे. ती कंपनी त्यांच्या उत्पादनात केशरयुक्त इलायची असल्याचे म्हणत, त्यांचे उत्पादन केशर मिश्रित पान मसाला म्हणून ग्राहकांसमोर सादर करत आहे. मात्र वरिष्ठ वकील इंदर मोहन सिंग यांच्या मते, हा दावा पूर्णपणे खोटा आहे, कारण केशराची किंमत सुमारे चार लाख रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे इतक्या महाग वस्तूचा वापर पाच रुपयांच्या पाउचमध्ये शक्यच नाही, असं त्यांनी न्यायालयात नमूद करत ही तक्रार नोंदवली आहे.

Salman Khan
 
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यांनुसार, “सलमान खान (Salman Khan) हा करोडो लोकांचा आदर्श आहे. जेव्हा तो एखाद्या उत्पादनाचं प्रमोशन करतो, तेव्हा लोक त्यावर विश्वास ठेवतात. परदेशात अनेक मोठे कलाकार कोल्ड ड्रिंकसुद्धा प्रमोट करत नाहीत, पण आपल्या देशात स्टार्स पान मसाल्यासारख्या हानिकारक उत्पादनांचं प्रमोशन करतात. त्यामुळे युवकांना चुकीचा संदेश दिला जातो.” कोटा ग्राहक न्यायालयाने या प्रकरणात सलमान खान आणि संबंधित कंपनीला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तक्रारीत नमूद केलं आहे की अशा प्रकारच्या जाहिराती समाजात आणि तरुणांमध्ये गैरसमज आणि चुकीचे संदेश पसरवतात.

Salman Khan
 
मात्र सलमान खान (Salman Khan) किंवा पान मसाला कंपनी यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सध्या सलमान खान, अपूर्व लखिया दिग्दर्शीत ‘बॅटल ऑफ गलवान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याबरोबरच तो ‘बिग बॉस १९’ या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचाल देखील करत आहे. पण या तक्रारीमुळे सलमान खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
 

 

Powered By Sangraha 9.0