Devendra Fadnavis : बंजारा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

05 Nov 2025 18:11:10
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) बंजारा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बंजारा समाजाच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
 
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा विभागात, बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने आणि उपोषणे सुरू होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाजाच्या भावना आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती.
 
हेही वाचा :  Pandharpur : पंढरपूरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान; कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य
या बैठकीदरम्यान बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण तसेच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “राज्य सरकार समाजाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून सर्व बाजूंचा सखोल अभ्यास करण्यात येईल. या आयोगाच्या शिफारशींवर आधारित निर्णय शासन घेईल.”
 
हे वाचलात का ? :  Salman Khan : सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात! नेमकं प्रकरण काय ?
 
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, संजय राठोड, अतुल सावे, इंद्रनील नाईक, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार राजेश राठोड, आमदार अर्जुन खोतकर तसेच बंजारा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0