'ओमकार' हत्तीला काहीच दिवसात 'वनतारा'मध्ये पाठवणार; सिंधुदुर्ग वन विभागाने कोर्टात दिली कबुली

04 Nov 2025 19:19:17
omkar elephant


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'ओमकार' नामक निमवयस्क हत्तीला गुजरातमधील 'वनतारा' रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यासाठी सिंधुदुर्ग वन विभाग धडपड करत आहे (omkar elephant). मंगळवार दि. ४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर पार पडलेल्या सुनावणीत सिंधुदुर्ग वन विभागाकडून भूमिका मांडण्यात आली (omkar elephant). यावेळी न्यायालयाने 'ओमकार'ला 'वनतारा'मध्ये पाठविण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सचूना वन विभागाला केली आहे (omkar elephant). दरम्यान या प्रकरणाची सुनावणी ६ नोव्हेंबर रोजी होणार असून दोडामार्गमध्ये 'वनतारा'च्या गाड्या दाखल झाल्या आहेत (omkar elephant).
 
 
 
'ओमका'र नामक निमवस्यक हत्ती हा दोडामार्गातील मुख्य कळपापासून वेगळा झाला असून तो स्वतंत्रपणे वावरत आहे. सध्या तो बांद्यात आहे. या हत्तीने ९ एप्रिल रोजी दोडामार्ग जिल्ह्यातील मोर्ले गावातील ६५ वर्षीय शेतकरी यशवंत गवस यांना ठार केले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर वन विभागाने या हत्तीला पकडण्याचे आदेश होते. तेव्हापासून या हत्तीला पकडण्यासाठी वन विभाग त्याच्या मागावर आहे. दरम्यान या हत्तीला पकडून 'वनतारा'मध्ये पाठवणार असल्याची भूमिका मंगळवारी सिंधुदुर्ग वन विभागाने न्यायालयासमोर मांडली. रोहित कांबळे यांना कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान वन विभागाने 'वनतारा'बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
 
 
अशावेळी दोडामार्गामधील ग्रीन व्हिलेज हाॅटेलमध्ये 'वनतारा'ची वाहने येऊन पोहोचली आहे. तसेच सिंधुदुर्ग वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील 'ओमकार' हत्तीची बांद्याजवळ गोवा-मुंबई महामार्गालगत अडवणूक करुन ठेवली आहे. जेणेकरून न्यायालयाने 'ओमकार'ला पकडण्यासाठी परवानगी दिल्यास त्याला पकडल्यानंतर महामार्गाने त्याची वाहतूक करणे सोयीचे जाईल. सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरात आठ रानटी हत्तींचा वावर आहे. त्यामधील केवळ 'ओमकार' हत्तीला डिसेंबरपर्यंत पकडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे
Powered By Sangraha 9.0