मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 'या' दिवशी होणार मतदान

04 Nov 2025 16:23:57

 
Maharashtra Local Body Election 2025
 
मुंबई : (Maharashtra Local Body Election 2025) राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात  मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. या दोन्ही संस्थांच्या निवडणूका येत्या २ डिसेंबरला होणार असून त्यानंतर लगेचच ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे.  


२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर :
  • अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर

  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - १७ नोव्हेंबर

  • अर्जाची छाननी - १८ नोव्हेंबर

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २५ नोव्हेंबर

  • मतदान - २ डिसेंबर

  • मतमोजणी - ३ डिसेंबर
Powered By Sangraha 9.0