Chandrashekhar Bawankule : उद्धव सरकारने गमावलेला ओबीसींचा हक्क महायुतीने मिळवला

04 Nov 2025 20:16:11
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी २७ टक्के राजकीय आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
 
मंगळवार दि.४ रोजी बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिगत प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाची बाजू यशस्वीपणे मांडली गेली, ज्यामुळे निवडणुकीला परवानगी मिळाली. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात गमावले होते, मात्र राज्यात शिंदे-फडणवीस-पवार यांचे महायुतीचे सरकार आल्यानंतर, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घातले. सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडली, ज्यामुळे २७ टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्यास कोर्टाने हिरवा कंदील दिला."
 
हेही वाचा :  Maharashtra Local Body Elections : संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेण्यासाठी आणि मतदान जागृतीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून...
 
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेताना ते म्हणाले, "ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, तीच यादी आता नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी वापरली जात आहे. तुम्ही निवडून आले तेव्हा यादी बरोबर होती आणि आता चुकलेली आहे, हे विरोधकांचे खोटारडेपण आहे. पराभवाची भीती असल्यामुळे विरोधक खोटा 'नरेटिव्ह' तयार करत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला ५१ टक्के मते मिळून मोठा विजय मिळेल हे विरोधकांनी ओळखले आहे."
 
रोहित पवार यांच्या 'निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव' या आरोपाला उत्तर देताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आव्हान दिले की, "ते ज्या यादीवर निवडून आले आणि नगरपालिकेच्या यादीत फरक दाखवावा व एक हजार रुपये बक्षीस घेऊन जावे. यादी तीच असून विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत."
 
 
Powered By Sangraha 9.0