Saurabh Rao : थकीत पाणी बिल भरणा करणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट : आयुक्त सौरभ राव

30 Nov 2025 13:40:30
Saurabh Rao
 
ठाणे : (Saurabh Rao) महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज) १०० टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव (Saurabh Rao) यांनी आज दिली. थकीत पाणीपट्टी बिलावर १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहिर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (Saurabh Rao)
 
ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी केले आहे.
 
हेही वाचा :  Dr. Babasaheb Ambedkar : काव्यपुष्पांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरंजली
 
सदर योजना दि. १‍ डिसेंबर २०२५ ते 31 मार्च २०२६ या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज)१०० टक्के सूट / सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. (Saurabh Rao)
 
हे वाचलात का ? :  Cyclone Ditwah : चक्रीवादळ दितवाह तामिळनाडू किनाऱ्याकडे सरकल्याने आयएमडीकडून ऑरेंज अलर्ट जारी! मुसळधार पावसात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू
 
जे नागरिक दि.३१/०३/२०२६ आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती अशी कारवाई होईल असे आयुक्त यांनी यावेळी नमूद केले. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावधी होणेसाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत व सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. (Saurabh Rao)
 
या योजनेचा लाभ जास्तीत नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव (Saurabh Rao) यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0