मुंबई : (Dr. Babasaheb Ambedkar) मुंबईतील एनसीपी मधल्या पेज टू स्टेज या उपक्रमांतर्गत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना आगळी वेगळी आदरांजली वाहण्यात येणार आहे. दि. ४ डिसेंबर रोजी एनसीपीएच्या लिटील थिएटर येथे सायंकाळी ६.३० वाजता "तू मदरबोर्ड जगण्याचा…" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये काव्यपुष्पांच्या माध्यमातून डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) आदरांजली वाहीली जाणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक मंगेश सातपुते, कवयित्री वृषाली विनायक, गायक प्रियपाल गायकवाड, नाटककार सुधीर चित्ते यावेळी काव्यवाचन करणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विनामूल्य आहे. आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी बुक माय शो अॅपवर नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (Dr. Babasaheb Ambedkar)