Anupam Kher : राज्यपालांच्या हस्ते अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान

30 Nov 2025 15:13:54
Anupam Kher
 
मुंबई : (Anupam Kher) शिमला येथील डी ए व्ही पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते डीएव्ही रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Anupam Kher)
 
कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांसह राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी, डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सुरी, डीएव्हीच्या संचालिका डॉ. निशा पेशीन तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (Anupam Kher)
 
हेही वाचा :  Pravin Darekar : महाडमधील निवडणूक ही दंडेलशाही विरोधातील; भाजपा आ. प्रवीण दरेकरांचा जाहीर सभेत घणाघात
 
राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही व्यवस्थापन समितीतर्फे संस्थेच्या प्रथितयश माजी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. राज्यपालांनी यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रांच्या माध्यमातून देशाला योगदान देत असल्याबद्दल त्यांना कौतुकाची थाप दिली. (Anupam Kher)
 
" शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूल येथे आपण पहिली ते अकरावी इतकी वर्षे शिक्षण घेतले. या संस्थेने आपल्याला भारतीय मूल्ये तसेच देश भक्तीचे संस्कार दिले. माझ्या जीवनात डीएव्ही पब्लिक स्कूलचे महत्व अनन्य साधारण आहे. त्या काळातले शिक्षक विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा द्यायचे.परंतु ते प्रेम व संस्कार देखील द्यायचे." असे अनुपम खेर यांनी सांगितले. (Anupam Kher)
 
Powered By Sangraha 9.0