Mangal Prabhat Lodha : गावदेवीच्या शारदा मंदिर शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर

03 Nov 2025 18:03:41
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : (Mangal Prabhat Lodha) विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र भक्तीची प्रेरणा जागृत करण्याच्या उद्देशाने कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी गावदेवीच्या शारदा मंदिर शाळेत ' वंदे मातरम् ' गीताचे विद्यार्थ्यांसह समूह गायन केले. 'वंदे मातरम' गीताला येत्या ७ नोव्हेंबरला १५० वर्ष पूर्ण होत असून या अनुषंगाने ' सार्ध शताब्दी महोत्सव ' अंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम् चे समूह गायन होणार आहे. मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सोमवारी या कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात केली.
 
देशभक्तीने भारलेल्या या वातावरणात मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विद्यार्थ्यांना या स्वातंत्र्यलढ्यातील स्फूर्ती गीताची महतीही सांगितली. 'वंदे मातरम् ' हे केवळ गीत नाही, तर आपल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना वंदन करून राष्ट्रप्रेमाची ज्योत या गीतामुळे सदैव तेवत राहील, असेही मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी यावेळी सांगितले.​
 
हेही वाचा :  प्रसिद्ध दिग्दर्शक-गायकाच्या प्रेमात आहे क्रिकेटपटू स्मृती मंधाना
 
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ' वंदे मातरम् ' गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही शासकीय स्तरावर विविध शिक्षण संस्थांमध्ये या गीताच्या समूह गायनाचे आदेश दिले आहेत. या निमित्ताने मनामनात राष्ट्र भक्तीची ज्योत जागवणाऱ्या या 'वंदे मातरम् ' गीताला विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले असल्याचेही मंत्री लोढा यावेळी म्हणाले.​ आम्ही राष्ट्रभक्तीच्या भावनेने वंदे मातरम म्हणणारच,तसेच या गीताचा विरोध करणाऱ्यांच्या घरासमोर ही ' वंदे मातरम् ' चे सामूहिक गायन करू, असे आव्हानही मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0