मुंबई : (JNPA) समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गिका जेएनपीए-वैतरणा (JNPA) या मार्गावरील न्यू सफाळेपासून भारतीय रेल्वेच्या खारबाव या अंदाजे ४० किलोमीटर मार्गावर डिझेल इंजिनद्वारे मालगाडीची यशस्वी चाचणी केली आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
डीएफसीसीआयएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, वरील कामे राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प अंतिम टप्प्यात प्रवेश करेल. डीएफसीसीआयएल अंतिम टप्प्याच्या रूपात जेएनपीटी–वैतराणा (JNPA) विभाग हा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला उर्वरित कॉरिडॉरशी जोडेल. यामुळे बंदरे ते भारतीय रेल्वेमार्गे अखंड मालवाहतूक सुनिश्चित होईल. यामुळे व्यापारातील स्पर्धात्मकता वाढेल.
सुधारित मालवाहतूक व पुरवठा शृंखलेच्या कार्यक्षमतेद्वारे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला बळकटी मिळेल. तसेच, मुंबई परिसरातील रस्ते व रेल्वे वाहतुकीवरील गर्दीमध्ये मोठी घट होईल. दरम्यान झालेली चाचणी धाव डीएफसीसीएलच्या मुंबई विभागाअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या जेएनपीटी–वैतराणा (JNPA) विभागातील रेल्वेमार्गावर झाली. या घटनेने डीएफएफएसीसीएलची मध्य रेल्वेशी अत्यंत महत्त्वाची जोडणी प्रस्थापित झाली आहे.
खारबाव ते जेएनपीटी (JNPA) दरम्यानचे उर्वरित कामही जलदगतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. हा मार्ग ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण केला जाईल. या विभागातील काही महत्त्वाच्या संरचनांमध्ये शिळफाटा रेल्वे ओव्हर ब्रिजचे पाडकाम आणि कळंबोली रेल्वे फूट ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण करणे यांचा समावेश आहे. या चाचणी धावेस डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण कुमार यांनी कॉर्पोरेट कार्यालयातील संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तर स्थळावर चीफ जनरल मॅनेजर, मुंबई विभाग विकास कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच डीएफसी, पीएमसी आणि टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.